मराठी भाषा गौरव दिन 27/02/2024

गुरुकुल ग्लोबल स्कूल मध्ये मराठी दिन उत्साहात साजरा

आमच्या उरा उरात स्पंदते मराठी।
आमच्या नसानसात नाचते मराठी ।।
धर्मा पंथ जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी ।।

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समिक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले, ज्यात ‘विवेकसिंधू’ (शा.श.१११०) हे मराठी भाषेतील पहिले ग्रंथ लिहीणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन १९६५ मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे महानायक वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे या निमित्ताने स्मरण होतो.

मराठी दिनाच्या निमित्ताने प्रसिद्ध नाटककार श्री प्रशांत शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे त्यांनी विद्यार्थ्यांच्या संगतीने एक छोटेसे नाट्य सादर केले. तसेच गुरुकुल ग्लोबल स्कूल मधील काही बालकलाकारांना श्री प्रशांत शेटे सर प्रशिक्षण देत आहेत.